बेल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सोहळा संपन्न
1 min read
बेल्हे दि.३१:- महाराष्ट्र शासनाकडून सन २०२३-२४ मध्ये, सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बालविकास विभागाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार बेल्हे (ता.जुन्नर) ग्रामपंचायत मार्फत गावातील सामाजिक कार्यकर्त्या सायली ताई वाघ आणि आशा वर्कर जमिला पठाण यांना देण्यात आला.
या कार्यक्रमात ग्रामविकास अधिकारी कल्पना दुराफे सरपंच गोरक्षनाथ वाघ ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते पुरस्कृत केले गेले तसेच इतर महिला कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास बेल्हे ग्रामपंचायत बेल्हे चे सर्व सदस्य, कर्मचारी वर्ग आणि महिलांनी उपस्थिती लावली.