वळसे पाटील महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
1 min read
निमगाव सावा दी.३१:- निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, संचालक दत्तात्रय घोडे गुरुजी, निमगाव सावाचे सरपंच किशोर घोडे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष परशुराम लगड, संदीप थोरात, बाबासाहेब बांगर, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व सेवक कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पांडुरंग पवार यांनी मनोगत व्यक्त केले. राज्यकारभाराची उत्तम जाण असणारी,संघटक, न्यायप्रिय, पराक्रमी योद्धा,परोपकारी, कुशल प्रशासक, तत्वज्ञानी राणी असे सर्वगुण संपन्न व्यक्तीमत्व म्हणजे अहिल्यादेवी होळकर. कलियुगात अहिल्यादेवी पुण्यश्लोक राणी होऊन गेली. प्रत्येक युगात एकच पुण्याश्लोक राजा होणं त्यामध्ये कलियुगाच्या यादीत अहिल्यादेवीच नाव येणं हे अत्यंत अभिमानास्पद आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभाराने प्रजाहितदक्षतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी स्त्रीशिक्षण, हुंडाबंदी, पर्यावरण रक्षण असे सुधारणावादी तसेच ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या योजना, प्रकल्प जाणीवपूर्वक राबविले.
नदीचे घाट, वाटसरूंसाठीच्या धर्मशाळा, मंदिरांची उभारणी-त्यांचा जिर्णोद्धार अशा अनेक गोष्टी आजही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देत उभ्या आहेत.खर तर या राणीने सामाजिक, धार्मिक,राजकीय क्षेत्रात जे काम केले जे आजच्या पिढीला आदर्श ठरणारे आहे. त्यांचे आपण अनुकरण केले तर एक कल्याणकारी राज्य निर्माण होईल त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन पांडुरंग पवार यांनी केले.