उद्या दहावीचा निकाल; दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार

1 min read

पुणे दि.१:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवारी (दि. २) दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य मंडळातर्फे करण्यात आली. त्यामुळे निकालाबाबतची उत्सुकता आता संपली आहे.विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पुढील काही तासात निकाल पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या लिंकवर निकाल पाहण्यास उपलब्ध असेल

१. www.mahresult.nic.in

२. http://sscresult.mkcl.org

३. https://ssc.mahresults.org.in

४. http://mh10.abpmajha.com

राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता. राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.दहावीचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती.

मात्र,आता निकालाची तारीख जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांची उत्कंठा अधिकच वाढली आहे. येत्या २ जून रोजी निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे