श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ९५%
1 min read
निमगाव सावा दीं.३१:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालय निमगाव सावा (ता.जुन्नर) या महाविद्यालयाचा इयत्ता बारावी वाणिज्य व विज्ञान शाखेचा शैक्षणिक वर्ष 2022- 23 चा निकाल शेकडा 95% लागल्याची माहिती प्राचार्य डॉ.छाया जाधव यांनी दिली.
महाविद्यालयातून इयत्ता बारावी वाणिज्य शाखेत एकूण 13 आणि विज्ञान शाखेत 33 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
इयत्ता 12 वी
*वाणिज्य*
*प्रथम तीन क्रमांक…*
1) साळवे निशा रविंद्र *-72.67
2डुकरे गीतांजली सुभाष-62.17
3) वाघ सुमित मच्छिंद्र-51.50
*विज्ञान शाखा प्रथम तीन क्रमांक*
1.फाकटकर प्रज्ञा कैलास.64.83
2. मते आयुष संदिप.57.50
3. नरवडे मयुरी संजय.54.00
या सर्व यशस्वी, गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक मा.पांडुरंग पवार साहेब, संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. छाया जाधव आणि सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.