कुलस्वामी खंडेराया मंदिर परिसराने सर्वांचे मनप्रसन्न झाले;माऊली कृपा ज्येष्ठ नागरिक संघ
1 min read
नळवणे दि.२१:- माऊली कृपा ज्येष्ठ नागरिक संघ साकोरी (ता.जुन्नर) या संघाने कुलस्वामी खंडेराया नळवणे या मंदिराला वनभोजनासाठी भेट दिली. त्यांच्यासमवेत विविध कार्यकारी सोसायटी साकोरीचे चे अरमन मच्छिंद्र कालेकर माजी सरपंच बाळकृष्ण साळवे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीधर उघडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष सावकार साळवे, सचिव वाळुंज जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे उपाध्यक्ष गोफणे, लक्ष्मण साळवे, डॉक्टर नेहरकर, सदाशिव उघडे, साकोरी गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष वामन नेहरकर,गजानन वाघ, भालचंद्र कुलकर्णी या सर्वांनी वनभोजनाचा आनंद लुटला.
या प्रसंगी राम कृष्ण हरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागोजी शिंदे यांनी व पोलीस पाटील शंकर कोंडाजी शिंदे व विश्वस्त समस्त ग्रामस्थ नळवणे यांच्या वतीने व देवस्थानच्या वतीने या सर्वांचा सन्मान करण्यात आला. माऊली कृपा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने या सर्वांचे ऋण व्यक्त करण्यात आले.
मंदिराचा परिसर अतिशय सुशोभित होता सर्वांची मनप्रसन्न झाली. खंडोबारायाच्या मंदिराला सर्वांनी अवश्य भेट द्यावी अशी संघाच्या वतीने सर्वांना विनंती अतिशय सुंदर व्यवस्था मंदिर परिसरामध्ये केलेले आहे.