आणे ग्रामपंचायतीच्या वतीने महिला, विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन चे मोफत वाटप
1 min read
आणे दि.२५:- आणे (ता. जुन्नर) येथे गावातील महिला व युवतीं, तसेच श्री रंगदास स्वामी आश्रम शाळा, सरदार पटेल हायस्कूल मधील किशोरवयीन मुलींना ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोगातून मोफत सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले. यावेळी शेकडो महिलां, किशोरवयीन मुली, शाळकरी विद्यार्थिनींना याचा लाभ झाला.
महिलांच्या वतीने ग्रामपंचायतचे आभार मानण्यात आले. श्री रंगस्वामी महाराज सांस्कृतिक भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गावच्या सरपंच प्रियांका दाते, ग्रामपंचायत सदस्य प्रियांका दाते, ज्योती आहेर, सुनिता दाते, अनिता आहेर यांसह शेकडो महिला उपस्थित होत्या.
