उच्च शिक्षित तरुणाने फुलवले ड्रॅगन फ्रुट चे पीक

1 min read

आळेफाटा दि.२६:- राजुरी येथील उच्च शिक्षित तरुणाने नोकरी करता करता ड्रॅगन फ्रुट या जातीच्या फळाची लागवड केली असून यामधून त्यांचा चांगल्या प्रकारचा नफा मिळवला आहे. राजुरी (ता.जुन्नर) या परीसरातुन पिंपळगाव कालवा तसेच कुकडी नदी गेल्याने हा परिसर सुजलाम सुफलाम झाला असुन. याच पाण्याच्या जोरावर येथील शेतकरी नवनविन प्रयोग करत असतात .असाच एक प्रयोग रविंद्र लक्ष्मण औटी व जानकी रविंद्र औटी या उच्चशिक्षित जोडप्याचे बी.आय.टी. पर्यंत शिक्षण घेतले असुन चांगल्या ठिकाणी काम करत असताना देखील केवळ शेतीची आवड असल्याने नोकरी करत असताना शेती करत आहेत.व यासाठी आपल्या शेतात कोणते पिक घेतल्याने आपल्याला कमी मेहनतीतून चांगला फायदा कसा होईल यासाठी सुरवातीला संपुर्ण अभ्यास करुन या फळाची लागवड करण्याचे त्यांणी ठरवले.औटी यांणी यासाठी १ एकर क्षेत्राची यासाठी निवड केली व यामध्ये सुरवातीला दहा बाय दहा फुटांच्या अंतरावर बेड पाडुन या बेडवर शेणखत टाकुन ट्रॅक्टर द्वारे मल्चिंग पेपर टाकुन घेतल्यावर सहा फुटाचे सिमेंट चे पोल यामध्ये उभे करून त्यावर लोखंडाचे चॅनल बसवुन घेतली व हे केल्यावर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या ठिकाणाहून संजीवनी ड्रॅग फ्रुट या जातीची ४२०० रोपे आणुन लावली.या पिकाला वेळोवेळी जैविक औषधी फवारणी केल्यानंतर साधारणपणे १४ महिन्यानंतर या झाडाला फळे आल्यानंतर पहिल्या तोडयात आतापर्यंत ५ टन माल निघाला असुन या वर्षी फळाला एका किलोला १३० रुपये बाजारभाव मिळाला होता. आतापर्यत या झाडांच्या संगोपनासाठी ९ ते१० लाख रुपये खर्च आला आहे. एका झाडाला १० ते १२ फळे लागत असुन एका फळांचे वजन ४०० ग्रॅम भरते व अजुन ५ टनाच्या वर माल निघणार असुन या मधुन त्यांणा चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे.विशेष म्हणजे हे पिक जुलै ते ऑक्टोंबर हे चार महिनेन चालते त्यानंतर या फळाला वातावरण गरम लागते यावर चौधरी यांणी शिजन नसताणा देखील येथील संपुर्ण बागेत झाडाच्या वरती ४०० बल्ब रात्रीच्या वेळी लावुन झाडांणा उष्णता देऊन दोन महिने जास्त बाग चालला होता.तसेच यासाठी त्यांणा गावचे उपसरपंच माऊली शेळके, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक वल्लभ शेळके,संजु औटी, गणेश सहकारी दूध संस्थेचे संचालक संजय औटी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.प्रतिक्रिया – रविंद्र औटी ड्रॅगन फ्रुट हे फळ उष्ण भागात तसेच कमी पाणी असलेल्या शेतावर विशेष करुन दुष्काळी परिसरात हे पिक घेतले जाते भारतातील केरळ,अंदमान निकोबार बेट,तामिळनाडु,आंध्रप्रदेश,ओडिसा,गुजरात या राज्यांमध्ये घेतले जाते.व या फळाकडे औषधी फळ म्हणुन खाले जाते कारण ह्रदय विकार,त्वचा रोग,मधुमेह, पचनक्रिया, केसांसाठी,कर्करोग,निरोगी हाडे,डोळयांचे आजार, आदी आजारांवर यांचा फायदा होत असल्याने या फळाकडे औषधी फळ म्हणुन पाहीले जाते.तसेच या संपुर्ण बागेला रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खते वापरली आहेत.तसेच यासाठी वडील लक्ष्मण आई संजीवनी पत्नी जानकी यांची मोलाची साथ मिळत आहे.बाजारभाव सन २०२१- एका किलोस १२० ते १३० सन २०२२- एका किलोस १२०ते १५० सन २०२३ एका किलोस १६० ते १८० सन २०२४ एका किलोस १४० ते १६०
सन २०२५ एका किलोस ८० ते १३०

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!