चैतन्य विद्यालयात टी. डी. लसीकरणाचे आयोजन : २५० विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग

1 min read

ओतूर दि.२६ – ग्राम विकास मंडळ ओतूरच्या चैतन्य विद्यालयात टी.डी.लसीकरण शिबीरचे आयोजन ओतूर प्राथमिक केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीहरी सlरोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली केले असल्याची माहिती मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली.विद्यालयातील इयत्ता दहावीतील २५० विद्यार्थ्यांना टी.डी. अर्थात धनुर्वात प्रतिबंधक लस देण्यात आली. विद्यार्थ्यांची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी, धर्नुवात ,घटसर्प आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस देण्यात आली. ही लस प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूरच्या आरोग्य सहाय्यिका सविता पगार, रंजना चव्हाण, आरोग्य सेवक सुनील यादव, शिल्पा रावते, मीरा सुरूसे, रमा वाघमारे, गटप्रवर्तक स्नेहल मुंढे, संजीवनी गायकवाड, आशा कार्यकर्ती संगीता डुंबरे, सारिका घुले, स्नेहल शिंगोटे, सुवर्णा दुर्गुडे आदींनी या लसीकरण मोहिमेत सहभाग घेतला.यावेळी संस्थेचे सचिव प्रदीप गाढवे, सहसचिव पंकज घोलप, उपमुख्याध्यापक संजय हिरे, पर्यवेक्षक अनिल उकिरडे, शिक्षक प्रतिनिधी अजित डांगे , भगवंता घोडे , मंगेश तांबे , देवचंद नेहे, ईश्वर ढमाले उपस्थित होते. भाऊसाहेब खाडे यांनी सर्वांचे स्वागत केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!