ओतूर ग्रामदैवत कपर्दिकेश्वर यात्रा उत्सव सुरू

1 min read

ओतूर दि.२५:- संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या ओतूर – (ता. जुन्नर) येथील ग्रामदैवत कपर्दीकेश्वरची श्रावण महिन्यातील सोमवार यात्रेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती श्री कपर्दीकेश्वर देव धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे नवनिर्वाचित सचिव गांधी पानसरे व ज्येष्ठ मार्गदर्शक जीआर – डुंबरे यांनी दिली.कपर्दिकेश्वराच्या मंदिरामध्ये शिवलिंगावर श्रावणी दर सोमवारी कोरड्या तांदळाच्या कलात्मक पिंडी बनविले जातात लाखो शिवभक्त या पिंडींचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. श्री कपरिचकेश्वर पहिला श्रावणी सोमवारी (दि. २८) सकाळी ८ ते १० वाजता कपर्दीकेश्वर मंदिर सभागृह येथे देवधर्म संस्था व शिवनेरीचे शिलेदार समूह यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण सरी संगीत मैफलीचा कार्यक्रम त्याचप्रमाणे सकाळी ८ ते ११ वाजता ओतूर शहरातील शालेय दिंडी महोत्सव दुपारी १२ ते ६ वाजता वारकरी भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तर दुसरा श्रावणी सोमवारी (दि. ४ ऑगस्ट) सकाळी ९ ते सायं ६ या वेळेत संगीत भजन स्पर्धा व तिसरा श्रावणी सोमवार व चौथा सोमवार दुपारी १ ते. सायं ५ वाजेपर्यंत कुस्त्यांचा भव्य आखाडा भरणार असून उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभाचे आयोजन ही करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट) सकाळी ११ ते दुपारी दोन वाजेपर्यंत कुस्त्यांचा शिळा आखाडा भरणारा असून यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती अनिल तांबे यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!