शिरूर तालुक्यात गुटखा विकणाऱ्यावर कारवाई

1 min read

शिरूर दि.२५:- शहरातील रिलायन्स जिओ पंप परिसरात गुटखा विक्रीसाठी आलेल्या युवकावर शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई करत तब्बल पाच लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अरबाज हमीद शेख (वय १९, रा. मोठी मशीद समोर, सुपा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला अटक करण्यात आली असून. न्यायालयाने त्याला २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना खबर्याकडून माहिती मिळताच आरोपी एमएच १६ डीजी ५५९७ क्रमांकाच्या लाल स्विफ्टमधून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जिओ पेट्रोल पंप परिसरात येताच निरीक्षक केंजळे यांनी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना कारवाईचे आदेश दिले. पथकाने स्विफ्टची झडती घेतली असता, गोवा १००० पान मसाला व अन्य तंबाखूजन्य पदार्थ असा ५२,५०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा सापडला, तसेच वाहतुकीसाठी वापरलेली सुमारे ५ लाख रुपये किंमतीची कार जप्त करण्यात आली. असा एकूण ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!