जुन्नर तालुक्यात तलावात बुडून पर्यटकाचा मृत्यू
1 min read
ओतूर दि.२१:- संततधार सरींमुळे निर्माण झालेल्या विहंगम निसर्ग सौंदर्याने हा परिसर प्रत्येकाच्या मनात घर करून राहिला आहे. आता हिरवीगार निसर्ग नवलाई दाखवू लागले असून, हा परिसर पर्यटकांना खुणावू लागला आहे.यातच ओतूर येथे रविवारी (दि. २०) रोजी पर्यटनासाठी आलेला जहीरअली सराजू अन्सारी
(वय २१, रा. नारायणगाव; मूळगाव रा. पडरौना, जि. कुसीनगर उत्तरप्रदेश) याचा धुरनळी जवळील तलावात पडून त्याचा मृत्यू झाला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. जहीरअली अन्सारी त्याच्या समवेत चार जण -होते ते ओतूर येथील धूरनळी येथे पर्यटनासाठी गेले असता दुपारी ४ वाजता लघुशंकेसाठी गेला असता.
तलावात पडल्याचे व बुडाल्याचे पर्यटकांनी पाहिले.तत्परतेने त्याच्या बरोबर आलेले ४ जण व पर्यटक व स्थानिकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. काही वेळात त्याला ओतूर येथील हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे असे डॉक्टरांनी घोषित केले. विशेषतः फेसाळणाऱ्या धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी
दुचाकी तसेच चार चाकीमधून फिरायला येणाऱ्यांची संख्या वाढली असून, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची झालेली गर्दी होत आहे. कडे कपार्यातून वाहत येणारे झरेमुंजाबा डोंगराचा धबधबा पर्यटकांना मोहिनी घालत आहे. त्यामुळे पर्यटकांनी तिथे जाताना आपली सर्वांनी काळजी घ्यावी.
असे जय बजरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल डुंबरे, विठ्ठल नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष मारुती पानसरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय डुंबरे, प्रवीण भाबुडेकर, समाजसेवक तानाजी तांबे, जयसिंग तांबे, प्रगतशील शेतकरी शरद फापाळे, सोमनाथ ठीकेकर, बबनराव डुंबरे, वैभव रावत, दिलीप शेटे यांनी सांगितले.
