मंगरूळच्या युवकाने ग्रामपंचायत कार्यालया समोर बांधले वासरू

1 min read

मंगरूळ दि.२२:- मंगरूळ (ता.जुन्नर) येथील वनविभागाचे क्षेत्र असून येथे अज्ञात पशुधन मालक वारंवार नर वासरे आणून सोडतात. वन विभागाच्या लगत असणाऱ्या रहिवाशांना याचा त्रास होत असून एका युवकाने हे वासरू ग्रामपंचायत कार्यालया समोर आणून बांधले.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, मंगरूळ गावचे युवक संतोष लामखडे यांचं घर वनविभागा लागत आहे. त्यांना नेहमीच या वासरांचा उपद्रव जाणवत आहे. सदर वासरू हे संतोष दत्तू लामखडे यांच्या घराजवळ आढळून आले. त्यांनी वारंवार या विषयी आवाज उठवला परंतु कुणी ही याकडे याकडे लक्ष दिले नाही. शेवटी संतोष दत्तू लामखडे यांनी सदर वासरू ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून बांधले. दूध उत्पादक शेतकरी यांचा दूध धंदा तोट्यात चालू आहे. सदर नर वासरांचा शेतकरी वर्गाला कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. सदर नर वासरांचं काय करावं हा शेतकरी वर्गासमोर मोठा यक्ष प्रश्न उभा आहे. काही नाईलाजास्तव वन विभागाच्या वनात सोडून वासरांना सोडून देतात. सदर प्रश्न शासनाने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी संतोष दत्तू लामखडे यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे