आळेफाटा येथील आकांक्षा एडके हिची पुणे कारागृह पोलिस दलात निवड

1 min read

आळेफाटा दि.२२:- जिद्द असेल तर यश लांब नसते हे वाक्य खरे ठरवले आहे मुळच्या (नैताळे ता. निफाड, जि. नाशिक) परंतु सध्या आळेफाटा(ता.जुन्नर)या ठिकाणी शिक्षणासाठी आलेल्या आकांक्षा संभाजी एडके हिची नुकतीच पुणे कारागृह पोलिस दलात निवड झाली आहे.आकांक्षाने अतीशय अडचणींवर मात करत यशाचा पल्ला गाठला आहे.तिचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असुन तिचे आई,वडील हे गावोगावी जाऊन भाजीपाला विकुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने आकांक्षाने प्रथम एका खासगी कंपनीत नोकरी केली. मात्र,पोलिस व्हायचे स्वप्न मनाशी घट्ट धरून तिने आळेफाटा येथील सुर्या अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. या वेळी आकांक्षा बोलताना म्हणाली की, सुर्या अकॅडमी यशाचे खरे व्यासपीठ सुर्या अकॅडमीमध्ये सर्वच सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होत्या. मैदान, क्लासरूम, अभ्यासिका, हॉस्टेल यामुळे वेळ व शक्ती यांचे उत्तम नियोजन करता आले.प्रत्येक आठवड्याला सराव परीक्षांचे आयोजन व मैदानी चाचणीचे डेमो यामुळे आत्मविश्वास वाढीस लागला. विशेष म्हणजे लेखी परीक्षेसाठी संस्थापक श्रीकांत मदने सर यांनी तीन महिन्यांचा अभ्यासक्रम चार्ट तयार करून दिला, जो अत्यंत फायदेशीर ठरला. मदने सरांनी वडिलांसारखी काळजी घेतली, मोठ्या भावाप्रमाणे पाठिंबा दिल्याने आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करू शकले.“अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये शिस्तीला अतिशय महत्त्व आहे. शिस्तीच्या बाबतीत खूप ‘कडक’ वातावरण असूनही आकांक्षाने जिद्दीच्या जोरावरच यश संपादन केले आहे. तिच्या या यशामागे तिच्या आई-वडिलांच्या कष्टाचे फळ मिळाले आहे. तिच्या या यशामुळे अनेक ग्रामीण भागातील तरुणींना प्रेरणा मिळणार आहे.”

श्रीकांत मदने, संचालक सूर्या करियर अकॅडमी

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!