शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणारा जेरबंद; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

1 min read

अहिल्यानगर दि.२२:- जादा परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार येथून ताब्यात घेतला आहे.भूपेंद्र साळवे असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शेअर मार्केटच्या नावाखाली नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणुकीचा आकडा मोठा असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी नंदुरबार येथून ताब्यात घेतला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!