चैतन्य विद्यालयात पालक सभा संपन्न:-५५० पालकांचा सहभाग

1 min read

ओतूर दि.२२:- ग्राम विकास मंडळ ओतूर संचलित चैतन्य विद्यालय ओतूरमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सहविचार सभा चार टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती. या सहविचार सभेस ५५० पालक उपस्थित होते. या पालक सभा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाल्याची माहिती शिक्षक पालक संघाचे सचिव अजित डांगे यांनी दिली.या सभेस मार्गदर्शन करताना ह. भ.प.गंगाराम महाराज डुंबरे म्हणाले की,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शाळेतच होतो. विद्यार्थ्यांचा भावनिक, मानसिक, बौद्धिक विकासाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्वास अनेक पैलू देण्याचे काम शाळा व शाळेतील शिक्षक करत असतात.पालकांनी आपल्या पाल्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक आहे.शाळेची शिस्त चांगली असून विद्यार्थ्यांवर चांगल्या प्रकारचे संस्कार शिक्षक करतात.गुणवत्तेच्या बाबत शाळा तालुक्यात प्रथम क्रमांकावर आहे.विविध स्पर्धा परीक्षा, गुणवत्तापूर्ण अभियान तसेच दहावीच्या परीक्षेत विद्यालयाने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल सर्व शिक्षकांचे सर्व पालकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले.ग्राम विकास मंडळ ओतूरचे सचिव प्रदीप गाढवे यांनी शाळा व संस्था विद्यार्थ्यांच्या प्रगती साठी करत असलेले प्रयत्न व उपलब्ध करून देत असलेल्या भौतिक सुविधा याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांना पुढे नेणे , त्यांचा सर्वांगीण विकासास चालना देणे,विद्यार्थ्यांची व शाळेची गुणवत्ता वाढविणे हाच शिक्षकांचा एकमेव उद्देश आहे. पालकांनी आपल्या पाल्याशी संवाद ठेवणे व त्याच्यात नकारात्मक दृष्टीकोन निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पालक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतचे वर्ग डिजिटल झाले असून यावर्षी इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतचे वर्गात स्मार्ट बोर्ड बसवायचे असून पालकांनी या कामी सहकार्य करावे. चैतन्य हा एक परिवार आहे. आपण सर्वजण याचे घटक आहोत. पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवून यावर्षी पाचवीला २७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. हा विश्वास आम्ही सार्थ ठरवू असे आश्वासन दिले. पाल्याचे भविष्य एकमेकांच्या सहकार्याने उज्वल करूया.या पालक सभेत शैक्षणिक वर्षात गुणवत्ता वाढीसाठी राबवण्यात येणारे उपक्रम, संस्कार, शिस्त व पालकांची जबाबदारी, विद्यार्थ्यांचा आहार व आरोग्य,नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, अभ्यासाच्या सवयी, स्पर्धा व बाह्य परीक्षांविषयी माहिती, विविध शालेय समित्यांचे एकत्रीकरण करणे व समिती वरील सदस्य निवड करणे या विषयांवर मार्गदर्शन प्रदीप गाढवे,पंकज घोलप, राजश्री भालेकर,संजय हिरे, अनिल उकीरडे, भाऊसाहेब खाडे, संतोष कांबळे, मिलिंद खेत्री, विशाल चौधरी,सोनाली माळवे, अमित झरेकर,मंगेश तांबे, अजित डांगे, देवचंद नेहे, अनिल जवरे यांनी केले.यावेळी उपस्थित पालकांच्या वतीने श्रीकांत महाकाळ, सखाराम वाळेकर, शेखर डुंबरे,स्वाती कुलवडे, रेखा पानसरे, निकेत डुंबरे,गोरख फापाळे,सचिन तांबे, अरुणा आरोटे, जयश्री डुंबरे,सुहास डेरे ,तुलसी पटेल यांनी शाळा विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यालयाची वाढती गुणवत्ता, शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घेत असलेले कष्ट, श्रम, विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ याबाबत समाधान व्यक्त केले.विद्यार्थ्यांना चांगली शिस्त, संस्कार व सवयी लावण्यासाठी सर्व पालक शिक्षकांना सहकार्य करतील असे आश्वासन दिले.याप्रसंगी विजया गडगे,राजाराम शिंदे,संतोष सोनवणे, बाळासाहेब साबळे, आसावरी गायकर, विजय खरात, योगेश फापाळे, ईश्वर ढमाले, निर्मला डोंगरे, साक्षी देशमुख, आशा डुंबरे, अनुराधा इसकांडे, हर्षल शितोळे, अश्विनी नलावडे, तेजस ढमाले, अरविंदआंबरे आणि बहुसंख्येने पालक उपस्थित होते.या पालक सभांचे प्रास्ताविक संजय हिरे, आशा गाडेकर, सोनाली कांबळे व सूत्रसंचालन शिल्पा भालेराव, वनिता भोर यांनी केले. भगवंता घोडे, लक्ष्मण दुडे, दिनेश ताठे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!