जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यालयाची स्थापना करा:- खासदार निलेश लंके

1 min read

अहिल्यानगर दि.२२:- जिल्ह्यामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करण्याची महत्वपूर्ण मागणी खासदार निलेश लंके यांनी सोमवारी (ता. २१) संसदेमध्ये केली. त्यांनी जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यापीठ स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे ठामपणे सांगितले.खासदार लंके यांनी आपल्या मागणीत स्पष्ट केले की, अहिल्यानगर हा जिल्हा मध्यवर्ती असून येथे केंद्रीय विश्वविद्यालय सुरू केल्यास मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची उत्तम संधी मिळेल. त्यांनी भर दिला की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये स्थलांतर करावे लागते. त्यामुळे आर्थिक भार वाढतो आणि अनेकदा शिक्षण अर्धवट राहते.खासदार लंके यांनी अहिल्यानगरच्या ऐतिहासिक महत्वालाही अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की, अहिल्यानगर जिल्ह्याला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्याचा भौगोलिक मध्यवर्तीपणाही शिक्षणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतो. त्यामुळे येथील विद्यापीठ केवळ जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी शिक्षणाचा केंद्रबिंदू ठरेल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!