पावात घुशीची लेंडी; बेकरीचालकाला अटक करा

1 min read

शिरूर दि.२४:- शहरातील रामलिंग रस्त्यावरील ‘सिरवी बंधू मिठाईवाले’ या बेकरीत पावाच्या लादीत घुशीची लेंडी आढळल्याची खळबळजनक घटना घडली होती. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी आवाज उठवल्याने बेकरी सील झाली आहे. आता बेकरीच्या मालकावर कलम २७२, २७३ अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटकेची मागणी जोर धरू लागली आहे.या प्रकरणी अन्न सुरक्षा विभागाचे निरीक्षक लक्ष्मीकांत सावळे यांनी संबंधित बेकरी सील केली असली तरी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फिर्याद नोंदवून बेकरीचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे