एकलहरे येथे एसटीला पिकअप धडकून दोघे जखमी
1 min read
मंचर दि.२४:- एसटी बस पुढे जात असताना भरधाव वेगात मागून येऊन पिकअप टेम्पोने एसटीला धडक दिल्यामुळे टेम्पोमधील दोघेजण जखमी झाले आहे. हा अपघात एकलहरे (ता. आंबेगाव) येथे बुधवारी (दि. २३) सकाळी ९ वाजता झाला. जखमींना मंचर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
राजगुरुनगर एसटी आगाराचे एसटी चालक संतोष कारभारी गायकवाड (वय ३६ रा. करुले ता. संगमनेर), वाहक अमोल नाना चव्हाण (वय ३१ रा. राक्षेवाडी राजगुरुनगर) हे पुणे-नाशिक एसटी बस घेऊन जात होते. एसटी (एमएच १४ बीटी ४९९९)
ही नारायणगावच्या दिशेने जात असताना एकलहरे बायपास रस्ता येथे मागून आलेल्या पिकअपने (एमएच ०६ एजी ४३७७) एसटी गाडीला मागून धडक दिली. या अपघात पिकअपमधील पिकअप चालक संदेश अनिल गुप्ता (वय २२ रा. शिनोली), तुषार कचर साबळे (वय २०, रा. फुलवडे) हे जखमी झाले आहेत.
त्यांना वैद्यकीय उपचारासाठी मंचर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.पिकअपमध्ये पुढे बसलेले दोघे अपघातामुळे केबिनमध्ये जखमी होऊन अडकले होते. रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी त्यांना पहारीचा वापर करून जखमी अवस्थेत बाहेर काढले.
