आण्यातला पीकअप चोरणारा अटक; 10 दिवसात आरोपी जेरबंद करून पिकअप जप्त; आळेफाटा पोलिसांची दमदार कामगिरी

1 min read

आणे दि.३१:- आणे (ता.जुन्नर) येथून घराच्या दारासमोर लावलेली पिकअप चोरी गेल्याची घटना मागील दहा-बारा दिवसांपूर्वी घडली होती.सदर चोराला आळेफाटा पोलिसांनी अटक केली असून त्याने पिकअप चोरल्याची कबुली दिली असून त्याकडून पीकअप जप्त केला असल्याची माहिती आळेफाटा पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.

या बाबत सविस्तर माहिती अशी की १८ मे २०२३ रोजी रंगनाथ धोंडीभाऊ आहेर, (वय 40) व्यवसाय शेती / ट्रान्सपोर्ट, रा. आणे, ता. जुन्नर यांची महिंद्रा कंपनीची मॅक्स पिकअप गाडी क्र. एम एच 14 सी डी 0124 ही गाडी घराच्या दारातून चोरी गेली होती. त्यांनी या बाबत अज्ञात चोरट्या विरोधात आळेफाटा पोलिसांत तक्रार दिली होती.

त्याचा शोध आळेफाटा पोलीस व तक्रारदार यांनी लगातार पाच-सहा दिवस केला. त्यामध्ये आरोपी  सचिन भास्कर जाधव (वय 28 रा. निमगाव वाघा, ता अहमदनगर जि. अहमदनगर) यातील आरोपी हा निष्पन्न झाल्याने त्यास दि. 28/5/2023 रोजी अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली पिक अप क्रमांक MH-14-CD-0124 , 3 लाख रु किमतीची एक महिंद्र कंपनी ची पांढऱ्या रंगाची मॅक्स पिकअप जप्त करण्यात आलेली आहे.

आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शना खाली, ए.पी आय.बडगुजर साहेब, पी एस. आय, पवार , ए,एस,आय. टाव्हरे,पोलीस पोलीस हवालदार विनोद गायकवाड नाईक पंकज पारखे, अमित माळुंजे ,पोलीस कॉनस्टेबल हनुमंत ढोबळे , नविन अरगडे आदी टीम ने दिवस रात्र शोध घेऊन आरोपीस गुन्हा घडल्या पासून 10 दिवसांत दिवसांत अटक केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे