आळेफाटा एस.टी.स्टॅडवर चोरी करणारी टोळी गजाआड

1 min read

आळेफाटा दि :- आळेफाटा (ता – जुन्नर) एस.टी.स्टॅडवर चोरी करणारी टोळी आळेफाटा पोलिसांनी गजाआड केली आहे. याबाबत आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांची दिलेल्या माहितीनुसार आळेफाटा येथील बस स्थानकात दि.१ नोव्हेंबर २२ रोजी छाया हरिश्चंद्र थोरात रा.कळंब या.आंबेगाव जि.पुणे या बस मध्ये चढत असताना चोरट्यांची गर्दीचा फायदा घेवुन त्याच्या पर्समध्ये ठेवलेले ३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व १ हजार रुपये रोख रक्कम असा ऐकुन १,५८,५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता.

त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीसांणा गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवुन आरोपीचे मोबाईल नंबर हस्तगत करुण आले व या मोबाईलच्या नंबरचे तांत्रिक विश्लेषण केल्याईनंतर हे आरोपी बिडकॉन ता.पैठण जी.संभाजीनगर (औरंगाबाद)येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पथक रवाना करून गुन्ह्यातील आरोपी बबन आनंदा भोसले (वय २७) रा.बाजारतळ बिडकॉन ता.पैठण जि.औरांगाबाद यास सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले.

त्याच्याकडे असुन चौकशी केली असता त्याने सांगितले की माझी साथीदार मंजु आनंदा भोसले रा.सारोळा कासार जि.अहमदनगर हिच्या मदतीने केले असल्याचे सांगितल्याने या आरोपीस नगर या ठिकाणी जाऊन ताब्यात घेण्यात आले.व या आरोपींकडे कसुन चौकशी केली असता त्यांणी चोरलेल्या सोन्याचे दागिने वितळुन त्याची १७ तोळे वजनाची ८,५०,००० रुपये किंमतीची लगड बनवुन राहत्या घरात लपवुन ठेवली असल्याची कबुली दिल्याने आरोपीस अटक करण्यात आली आहे.


हि कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक अंकित गोयल,पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे,उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांची दिलेल्या सुचना नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर,नरेंद्र गायकवाड,विनोद गायकवाड, पंकज पारखे,अमित माळुंजे ,नविन अरगडे,हनुमंत ठोबळे ,प्रशांत तांगडकर दिपाली फटांगरे यांची केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे