दारासमोर लावलेली पिकअप चोरीला; वाहन चोरांचे प्रमाण वाढले

1 min read

आणे दि.२०:- आणे (ता.जुन्नर) येथून घराच्या दारासमोर लावलेली पिकअप चोरी गेल्याची घटना नुकतीच उघड झाली असून जुन्नर तालुक्यामध्ये वाहन चोरांचे प्रमाण वाढल्याचे चित्र पुन्हा समोर येत आहे.

रंगनाथ धोंडीभाऊ आहेर, (वय 40) व्यवसाय शेती / ट्रान्सपोर्ट, रा. आणे, ता. जुन्नर यांची महिंद्रा कंपनीची मॅक्स पिकअप गाडी क्र. एम एच 14 सी डी 0124 ही गाडी दारातून चोरी गेली असून त्यांनी अज्ञात चोरट्या विरोधात आळेफाटा पोलिसांत तक्रार दिली आहे.

आळेफाटा पोलिसांत आहेर यांनी दिलेली माहिती अशी की गुरुवार (दि.१८) सकाळी 0८ वा चे सुमारास आणे येथुन पिकअप चालक सुनिल दाते हे पाण्याचे जार घेवुन शिंदेवाडी (ता. जुन्नर) येथे गेला होता व तेथुन पुन्हा सकाळी 10 वाजता चे सुमारास गाडी आमचे घराचे समोर आणुन लावली व तो त्याच्या घरी निघुन गेला.

त्यानंतर दिवसभर सदरची पिक अप ही आमचे घराचे समोर होती. रात्री घरातील मंडळी रात्री ११ ते १२ वा च्या सुमारास झोपी गेले. त्यानंतर सकाळी 6 वाजण्याच्या चे सुमारास उठल्यानंतर घराचे समोर उभी असलेली गाडी दिसली नाही. म्हणुन त्यांनी गाडीवरील चालक सुनिल  दाते यांचे कडे फोनवर सदरचे गाडीबाबत चैकशी केली असता त्यांनी सांगितले की, मी गाडी घेवुन गेलेलो नाही.

त्यानंतर आहेर यांनी गाडीचा आजुबाजुचे परिसरात व इतरत्र शोध घेतला असता गाडी मिळुन आली नाही.त्यानंतर आहेर यांनी अज्ञात चोरटया विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे