डॉ. कदम जीवन विकास प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचा 100℅ निकाल

1 min read

गलांडवाडी दि.२६:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये डॉ. कदम जीवन विकास प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे 65 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.

त्यामध्ये ओम दत्तात्रय ढुके -90.00%, वैष्णवी दादा भांगे- 86.00% व शिवराजसिंह अर्जुन शिंदे- 83.50% गुण मिळवून अनुक्रमे पहिला,दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. तर ओम ढुके याने बायोलॉजी या विषयांमध्ये 100 पैकी 97 गुण मिळवून बोर्डच्या गुणवत्ता यादीत आपले नाव समाविष्ट केले. तसेच प्रशालेचे डिस्टिंशन मध्ये 12, प्रथम श्रेणीमध्ये 34, द्वितीय श्रेणीमध्ये 18, पास श्रेणीमध्ये 1 विद्यार्थ्यांनी बाजी मारून 100% निकालाची परंपरा कायम राखलेली आहे.

त्याबद्दल प्रशालेचे अध्यक्ष डॉ. एल.एस.कदम शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे