भारताला अंदमानात 2 लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं
1 min read
मुंबई दि.२४:- भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताला अंदमानच्या समुद्रात 2 लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचे भांडार सापडले आहे. याबाबतची माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह यांनी दिली. हरदीप सिंह पुरी म्हणाले की, जर हा अंदाज बरोबर निघाला तर भारताचा जीडीपी 5 पट वाढू शकतो.
सरकारी मालकीची कंपनी ‘ओएनजीसी’ने आर्थिक वर्ष 2024 मध्ये तब्बल 541 विहिरी खोदल्या. मागील 37 वर्षांतील ही सर्वाधिक मोठी संख्या आहे. आजदेखील भारत स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी 85 टक्के खनिज तेल आयात करतो.
परंतु, या विहिरीतून उत्खनन सुरू झाल्यास भारताला डिझेल/पेट्रोलसाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही. हा पेट्रोलियम साठा गयानामध्ये काही दिवसापूर्वी सापडलेल्या कच्च्या तेलाच्या साठ्याइतका (11.6 अब्ज बॅरल) असू शकतो.
जर हा अंदाज शोध आणि संशोधनात बरोबर ठरला तर भारताचा जीडीपी एकाच वेळी 3.7 ट्रिलियन डॉलर्सवरून 20 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढू शकतो.जर अंदमानमध्ये कच्च्या तेलाचे साठे मिळाले तर भारत तेल आयात मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो.जर तसे झाले तर आर्थिक स्थिती मजबूत करू शकतो.
भारत सध्या आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कच्च्या तेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. देशाचा सर्वात जास्त खर्च कच्चा तेलावर होतो. आकडेवारीनुसार,
देशातील 85% पेक्षा जास्त कच्चे तेल आंतरराष्ट्रीय पुरवठादारांकडून मिळते. जागतिक स्तरावर, अमेरिका आणि चीननंतर भारत हा कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे.
