श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूलच्या विद्यार्थांचा नित्यनियमाने योगा करण्याचा संकल्प
1 min read
रानमळा दि.२४:- श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल, रानमळा येथे २१ जून ” आंतरराष्ट्रीय योग दिन ” उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनीच अतिशय उत्साहात सामूहिक रित्या विविध योग प्रकार केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदाम जगताप यांनी विद्यार्थ्याना योगाचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. विद्या औटी यांनी विद्यर्थ्यांना योगाच्या विविध प्रकारांचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी यापुढे आयुष्यभर नित्यनियमाने योगा करण्याचा संकल्प केला.या प्रसंगी रमेश मालुंजकर, संतोष कर्डक व माया माळवे, जयश्री थोरात आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
