गुरुवर्य एकनाथ गोविंद देव प्रशालेचा ३७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

1 min read

बोरी दि.२४:- २२ जून १९८८ हा गुरुवर्य एकनाथ गोविंद देव प्रशाला,बोरी खुर्द(जुन्नर) या शाळेचा स्थापना दिवस.दरवर्षी २२ जून हा दिवस शाळेचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो.याही वर्षी शाळेचा ३७ वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अशी माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी दिली.या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आर्किटेक्ट व रोटरी डिस्ट्रिक्टचे डायरेक्टर सचिन घोडेकर, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे उप प्रांतपाल धनंजय राजुरकर, प्रशालेचे माजी विद्यार्थी व पुणे येथील उद्योजक वैभव बेल्हेकर व शेखर सोनवणे,प्रशालेचा माजी विद्यार्थी व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी पुणे येथे कार्यरत वैज्ञानिक डॉ.सचिन पटाडे यांच्या उपस्थितीत साजरा झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोन्नती मंडळाचे सचिव नरहरी शिंदे हे होते.प्रशालेची टुमदार व आकर्षक इमारत,डिजिटल क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा, इ-लर्निग, फाली उपक्रमाअंतर्गत आधुनिक शेती तंत्रज्ञान व भौतिक सुविधा पाहून शहरातील शाळेत मिळणाऱ्या सर्व सुख सुविधा या छोट्या शाळेत मिळतात असे भाग्यवान विद्यार्थी या शाळेत शिकतात असे गौरवोद्गार सचिन घोडेकर यांनी काढले.संस्था,ग्रामस्थ व शिक्षक यांच्या प्रयत्नातूनच ही घडू शकते अशी कौतुकाची थाप त्यांनी दिली.प्रशालेचा माजी विद्यार्थी वैज्ञानिक सचिन पटाडे याने माझे आई वडील अशिक्षित असताना मी जीवनात कसा यशस्वी झालो याचे दाखले देत विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्न केल्यास आपल्या आवडीच्या क्षेत्रात नक्कीच यश मिळवता येते असा कानमंत्र दिला.कृत्रिम ढगांची निर्मिती व कृत्रिम पाऊस कसा पडला जातो याची माहिती उपस्थितांना दिली.सर्वोन्नती मंडळाचे अध्यक्ष विक्रम शिंदे यांनी शाळेसाठी मोफत जमीन दान करणाऱ्या भूदात्त्यांप्रती ऋण व्यक्त केले.प्रशालेची गुणवत्ता व शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले.भविष्य काळात शाळेत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत त्यासाठी व मॉडेल स्कूल बनवण्यासाठी शिक्षकांनी विशेष मेहनत घ्यावी असे आवाहन केले. आर्किटेक्ट सचिन घोडेकर यांनी प्रशालेसाठी लागणाऱ्या भौतिक व शैक्षणिक सुविधा ऑटोमेटेड शौचालय, रोटरीचे इ-लर्निग ॲप देण्याचे जाहीर केले.तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्याख्यानमाला व करिअर मार्गदर्शन सुरू करणार आहोत असे आश्वासन दिले.माजी विद्यार्थी वैभव बेल्हेकर व सचिन पटाडे व गौतम काळे यांनी स्वखर्चातून वर्गखोल्यांसाठी फरशी बसवून देण्याचे काम केले तर माजी विद्यार्थी शेखर सोनवणे व संग्राम सोनवणे यांनी चार सी.सी. टीव्ही कॅमेरे बसवून दिले. व वृक्षारोपणासाठी लागणारी झाडे उपलब्ध करून दिली.शिक्षणप्रेमी ग्रामस्थ आणि राहुल काळे,अमोल काळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या.भविष्यात शाळेसाठी लागणारी मदत रोटरी डिस्ट्रिक्ट आणि माजी विद्यार्थी यांचेकडून केली जाईल असे भरीव आश्वासन दिले.या कार्यक्रमासाठी सर्वोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष लक्ष्मण काळे, कार्याध्यक्ष बाजीराव बांगर, संचालक सुनील बेल्हेकर, सुभाष शिंदे, योगेश काळे, भरत चिंचवडे, गावचे माजी उपसरपंच संतोष काळे, दीपक बेल्हेकर, प्रा.संजय जाधव,रंगनाथ बांगर, गणेश सोनवणे, रवींद्र पटाडे, गणेश गाडगे ,संतोष ढोबळे, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ,पालक व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अमित शेटे, हर्षदा जाधव, सोनल जाधव, रवींद्र जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रशालेचे माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी प्रास्ताविक केले, शिक्षक संजय धायबर यांनी सूत्रसंचलन केले तर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक शमशुद्दीन पटेल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!