आळेफाटा बसस्थानकामधुन चोरट्याने पळवले प्रवाशी महिलेचे ३ तोळ्याचे मंगळसूत्र
1 min read
आळेफाटा दि १७:- जुन्नर तालु्यामध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून आळेफाटा ( ता जुन्नर) येथील बसस्थानकामधुन अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील सुमारे दिड लाख रुपये किमतीचे तिन तोळ्याचे मंगळसूत्र लांबविले असल्याची घटना मंगळवारी ( दि १६) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबतची फिर्याद आश्विनी सागर सरोदे ( वय ३४ रा संगमनेर जि अहमदनगर) यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिली आहे.
आश्विनी सरोदे या त्यांच्या माहेरी उंब्रज या ठिकाणी आल्या होत्या त्या संगमनेर या ठिकाणी जाण्यासाठी आळेफाटा बसस्थानकातून त्या बसमध्ये बसल्या व तिकिट काढण्यासाठी त्यांनी पर्स उघडली असता पर्समधुन मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात आले त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास आळेफाटा पोलिस करत आहे.