राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठे निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय
1 min read
मुंबई दि.२७:- राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा महत्वाचा निर्णय यात घेण्यात आला आहे.
या शिवाय इचलकरंजी व जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता याच बैठकीत देण्यात आली आहे. या शिवाय अन्य काही निर्णय घेण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंगळवारी पार पडली. मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. या पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं असून सगळ्याच क्षेत्रात या पावसाचा जोरदार फटका बसला आहे.
त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. याचदरम्यान, राज्य सरकारकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
त्यात शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला फडणवीस सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत वन, महसूल, शालेय शिक्षण, कृषि, वस्त्रोद्योग विभागासंबंधीच्या निर्णयांचाही समावेश आहे.
याचवेळी राज्य सरकारनं इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारनं वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. तसेच यापुढे अवघ्या 500 रुपयांमध्ये शेतीची वाटणी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा अतिशय दिलासादायक निर्णय मानला जात आहे