पावसाचा नवा विक्रम,मान्सून 16 दिवस आधीच मुंबईत दाखल

1 min read

मुंबई दि.२७:- 16 दिवसा आधीच मान्सून मुंबईत दाखल झाल्याने एक विक्रम केला आहे. दरम्यान, मुंबईत पहाटेपासून पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, मुंबईत याआधी मान्सून लवकर येण्याचा मागील विक्रम हा 29 मे होता. 1956, 1962 आणि 1971 या वर्षात नोंदवला गेला होता. (Mumbai receives 135 mm rainfall today shatters 107-year-old record for month of May)मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, महापालिका क्षेत्रात रविवारी (25 मे) ते सोमवारी (26 मे) रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत नरिमन पॉइंट परिसरात तब्बल 252 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच, मुंबईत आतापर्यंत मे महिन्यात एकूण 294 मिमी पाऊस पडला आहे. तेच 107 वर्षांपूर्वी म्हणजेच 1918 साली मे महिन्यात 279 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर, मुंबईत सकाळी 8.30 पर्यंतच्या 24 तासांत 135 मिमी पावसाची नोंद झाली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे