दुचाकीची चोरी करणारी टोळी जेरबंद;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
1 min read
अहिल्यानगर दि.२८:- अहिल्यानगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात दुचाकीची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून आठ दुचाक्या असा एकूण आठ लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ओमकार शैलेश रोहम (वय २०, रा.रांजणगाव रोड, ता.राहाता), सोनू सुधाकर पवार (वय २४, रा.साकुरी, ता.राहाता, जि.अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गणेश गोरखनाथ दरेकर (रा.पिंपळगाव जलाल,
ता.येवला, जि.नाशिक) याचेसह राहाता व श्रीरामपूर तालुक्यात चोरी केली असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. त्यांच्याकडून आठ लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने ही कारवाई केली.