प्राप्तिकर विवरण सादर करण्याची मुदत वाढली; ३१ जुलै ऐवजी…..
1 min read
नवी दिल्ली दि.२८:-प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार मूल्यांकन वर्ष २०२५-२६ साठीचे प्राप्तिकर विवरण भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै ऐवजी १५ सप्टेंबर असे करण्यात आली आहे.व्यक्ती आणि इतर संस्था, की ज्यांचे ताळेबंद ऑडिट करण्याची गरज नाही, त्यांना अगोदर ३१ जुलैपूर्वी विवरण सादर करायचे होते. आता १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत विवरण सादर करता येऊ शकणार आहे. विवरणासाठी नवे फॉर्म जारी करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने करदात्यांना आणि कर विभागाला तयारी करण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. सर्व बाबींचा विचार करून ही तारीख वाढविण्यात आली आहे.
मात्र नव्या फॉर्ममुळे कर दात्यांना विवरण पूर्वीपेक्षा अधिक सहज भरता येऊ शकेल असे कर विभागाला वाटते.दरम्यान, कर विभागाने हा निर्णय घेतल्यानंतर बऱ्याच करदात्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे त्याना चांगलाच दिलासा मिळाला आहे.