समर्थ फार्मसीच्या १७ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यामध्ये निवड

1 min read

बेल्हे दि.२८:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल च्या वतीने नुकतेच पूल कॅम्पस ड्राइव्ह २०२५ चे आयोजन करण्यात आले होते.या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये फार्मसी च्या अंतिम वर्षातील ५५ विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग दर्शविला. आय टेक सायंटिफिक प्रायव्हेट लिमिटेड, पुणे आणि हॉकस फोकस सायंटिफिक प्रा.लि.पुणे या कंपन्यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी या दोन्ही औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समूह चर्चा तसेच वैयक्तिक मुलाखतीच्या फेऱ्या यशस्वीपणे पार केल्या.त्यानंतर अंतिम निवडीसाठी कंपनीच्या मुख्य कार्यालयामध्ये मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये यामध्ये अंतिम मुलाखतीसाठी महाविद्यालयातील १७ विद्यार्थ्यांची कंपनीद्वारे निवड झाल्याची माहिती समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी दिली.आयटेक सायंटिफिक प्रायव्हेट लिमिटेड पुणे चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुब्रोतो भट्टाचार्यजी व होकस फोकस सायंटिफिक प्रायव्हेट लिमिटेड पुणे चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.निताशा भट्टाचार्यजी यांनी मुलाखतीची सर्व निवड प्रक्रिया पूर्ण केली.अकाऊंट मॅनेजर आणि टेरिटरी मॅनेजर या पदांसाठी सदर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:- समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मधील प्रतीक्षा गायकवाड, भक्ती इंगळे, स्नेहल लामखडे, सुहानी भगत, शुभांगी डुकरे, गायत्री डोके, अजिंक्य दराडे, प्रगती दराडे, सानिका कराले, प्रतिक्षा दिनकर, संकेत चौधरी, अब्दुलरहीम शेख, प्रसाद गाडगे, मंगेश थोरात तसेच समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी मधील अभिषेक कोळी, पायल वारे, प्रियांका तांबे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ.सागर तांबे व डॉ.बिपीन गांधी यांनी कॅम्पस ड्राईव्ह चे यशस्वी नियोजन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ कुलदीप रामटेके,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर,डॉ.सचिन दातखिळे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे