यंदा मे महिन्यात सर्वाधिक विवाह मुहूर्त; एप्रिलनंतर जूनपर्यंत फक्त २७ दिवस मुहूर्त

1 min read

जुन्नर दि. २९:- यंदा एप्रिल आणि मे महिन्यात लग्नाचे अधिक मुहूर्त असल्याने या दोन महिन्यांत सगळ्यात जास्त लग्नाचे बार उडणार आहेत. जून महिन्यात फक्त पाच मूहूर्त आहेत. ८ जून ते २२ नोव्हेबरर्यंत गुरूचा अस्त आणि चातुर्मास असल्याने लग्नाचे मुहूर्त नाहीत. एप्रिल आणि मे महिन्यातील मुहूर्ताना सर्वांची पसंती असल्याचे मंगल कार्यालय,हॉटेल्स, रिसॉर्ट आणि वेडिंग डेस्टिनेशच्या नोंदणीवरून दिसून येत आहे.मे महिन्यात १२ दिवसमुहूर्त असून या सर्व तारखांना हॉल आणि मंगल कार्यालयांचे अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. एप्रिलमध्ये त्यापाठोपाठ आठ, तर जूनमध्ये फक्त पाच मुहूर्त आहेत. आठ जूनपासून ते ११ नोव्हेंबरपर्यंत गुरूचा अस्त व चातुर्मास आहे. त्यामुळे लग्नाचे मुहूर्त नाहीत. एप्रिल, मे आणि जून असे तीनच महिने सर्वाधिक मुहूर्त आहेत. १९ एप्रिलपासून यंदा डिसेंबर महिन्यापर्यंत फक्त २६ लग्नाचे मुहूर्त आहेत. नोव्हेंबरमध्ये एक आणि डिसेंबरमध्ये दोन असे तीनच मुहूर्त वर्ष अखेरीस आहे. पाच डिसेंबरपासून ते ६ फेब्रुवारीपर्यंत शुक्राचा अस्त आहे. त्यामुळे मुहूर्त नाहीत.

विवाह मुहूर्त २०२५ (१) एप्रिल : १९, २०, २१, २२, २५ , ३० (२) मे १, ६, ७, ८, ९, १०, १३, १८,२३,२४ १४, १६, (३)जून : २, ४, ५, ६, ८

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे