श्री खंडोबा देवस्थानचा प्रथम वर्धापन साजरा; भाविकांचा मोठा उत्साह

1 min read

आणे दि.२२:- श्री खंडोबा देवस्थान आळे येथे प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पहाटे श्री च्या मूर्तीचा अमृत अभिषेक, त्यानंतर महाआरती, मल्हारी महात्मे पारायण, जागरण, गोंधळ, पालखी मिरवणूक, देऊळकाठी मंदिर प्रदक्षिणा व मिरवणूक, त्यानंतर महाआरती, सामायिक तळी भंडार, रात्री भागवताचार्य हभप रुपालीताई सवणे परतुरकर यांचे हरिकीर्तन संपन्न झाले. यावेळी हजारोंच्या संख्येने भावी उपस्थित होते. देवस्थानला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले असल्याने हा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वर्षभर नियमितपणे प्रत्येक पौर्णिमा, चंपाषष्ठी , सोमवती अमावस्या या दिवशी महाआरती,पालखी, काठी पालखी मिरवणूक, तळी भंडार, अन्नदान असे विविध कार्यक्रम संपन्न होतात.नवसाला पावणारा खंडोबा अशी देवस्थानची ख्याती झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्नदाते व देणगीदार देणगी देतात, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष उदय पाटील भुजबळ यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे