आळ्याची यात्रा २३ एप्रिल पासून; यंदा भरगच्च कार्यक्रम
1 min read
आळेफाटा दि.५:- पुणे जिल्ह्यातील मोठी यात्रा म्हणुन ओळख असलेली व श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलविलेल्या रेडा समाधी यात्रा महोत्सव दि.२३ एप्रिल पासुन सुरू होत असल्याने वार्षिक यात्रेच्या नियोजनाची मिटींग येथील मंदिरात पार पडली.
या वेळी श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष संजय गाढवे, उपाध्यक्ष अमोल भुजबळ,सचीव सुनिल जाधव,यात्रा कमेटीचे अध्यक्ष गणेश शेळके,पुणे जिल्हा परीषदेचे माजी सदस्य प्रसंन्न डोके, आळेफाटा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे,
पंचायत समितीचे माजी सदस्य, नेताजी डोके, जिवन शिंदे, कोळवाडी गावचे उपसरपंच दिनेश सहाणे, होणाजी गुंजाळ,संतोष कु-हाडे, म्हतू सहाने, एकनाथ कु-हाडे, व्यवस्थापक कान्हु कु-हाडे,दिगंबर कु-हाडे, चारूदास साबळे,अरूण गुंजाळ, नागेश कु-हाडे , पोलिस पाटील सुनीता म्हस्कुले, तसेच
आरोग्य विभाग, महावितरण कंपनी,पोलीस प्रशासन, एस.टी. महामंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थित पार पडली. यावर्षी चैत्र वद्य दशमी दि.२३ एप्रिल रोजी श्रींचा अभिषेक व दुपारी १२ ते ६ भजन महोत्सव, चैत्र वद्य एकादशी दिवशी बुधवार दि.२४ एप्रिल रोजी
सकाळी पहाटे ५ वाजता शासकीय महापूजा तहसीलदार डॉ .सुनिल शेळके यांच्या हस्ते सपंन्न होणार असून दुपारी १२ ते ५ या वेळेत पालखी सोहळा संध्याकाळी ८ वाजता गुरूवर्य ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन होणार असून
संध्या ११ ते ५ तुकाईमाता विठ्ठल भक्त प्रासादिक भजनी भारुड मंडळ राजूरी यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.दि.२५ एप्रिल रोजी सकाळी महापूजा होणार असून संतवाडी, कोळवाडी, डावखरवाडी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद चे आयोजन करण्यात आलेले आहे.
दुपारी ४ ते ८ कुस्त्या चा जंगी आखाडा आयोजित केला असून रात्री ८ वाजता ह.भ.प. विशाल महाराज हाडवळे यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. दि.२६ रोजी ह.भ.प.सुदाम महाराज बनकर यांचे काल्याच्या किर्तणाने यात्रेची सांगता होणार आहे.