पांडुरंग पवार यांच्या प्रयत्नांना यश: बोरी ते जेजुरी एसटी बस सेवा उद्या पासून सुरु

1 min read

बेल्हे दि.९ :-आता सर्व सामान्यांना जेजुरीला जाण सोपं झाल असून माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. नारायणगाव आगाराची बोरी-बेल्हे-जेजुरी-बारामती एसटी बस उद्या दि.१० पासून सुरू होत आहे.

ही बस रोज सकाळी 7 वाजता बोरी येथून सुटेल/ बेल्हे 7-15 / साकुरी 7-20/मंगरुळ पारगाव 7-30 /लोणी 8/ पाबळ 8-15/शिक्रापूर 9 वाजता/तळेगाव ढमढेरे 9-45 /उरळी कांचन 10-30/जेजुरी 11-30 पोहचेल /मोरगाव गणपती 12/ बारामती 12-30 पोहचेल त्या नंतर हीच बस पुन्हा दुपारी 1 वाजता बारामती येथून सुटेल मोरगाव गणपती 2 वाजता /जेजुरी दुपारी 3 वाजता/उरळी कांचन,शिक्रापूर,पाबळ,लोणी,पारगाव, बेल्हे-बोरी, आळेफाटा- मार्गे नारायणगाव डेपोला पोहचेल.

बेल्हे-जेजुरी हे अंतर सुमारे 110 किलोमीटर असून या मार्गावरती लहान-मोठे अंदाजे 20 ते 25 गावे असून या परिसरातील सर्व भाविकांना दर्शनाचा लाभ होईल. जेष्ठ नागरिक,महिलांना खंडेरायाला जाण सोपं झालं आहे. ही बस सुरू होत असल्याने बोरी, बेल्हे,साकोरी,पारगाव, निमगाव सावा ग्रामस्थांनी प्रशासनाचे तसेच पांडुरंग पवार यांचे आभार मानले.

नुकताच महाराष्ट्र शासनाने बेल्हे-जेजुरी राज्य महामार्ग क्रमांक 117 रस्ता चे काम पूर्ण केले असून हा रस्ता जुन्नर, आंबेगाव, शिरूर, हवेली व पुरंदर या पाच तालुक्यातून जात असून महाराष्ट्रातील भाविकांचे कुलदैवत असणारे श्री खंडोबा मंदिर पर्यंत गेल्यामुळे नवीन एसटी बस सेवा सुरू केल्याने या भागातील भाविकांची दर्शनाची चांगली सोय होणार असल्याने बस सुरू करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे