बिबटयाच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

1 min read

राजुरी दि.८:- राजुरी (ता.जुन्नर) येथील आबाटेक मळ्यात रहात असलेले मनेश दगडु कणसे यांचा शेळी व कोंबड्या पालणाचा व्यवसाय असुन सोमवारी (दि.८) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास गोठयातुन शेळयांचा ओरडण्याचा आवाज आला असता ते त्या ठिकाणी गेले असता बिबट्याने दोन शेळया मृत अवस्थेत आढळल्या.

बिबट्या तिस-या शेळीवर हल्ला करण्याच्या तयारीत असताना कणसे यांची मोठ्याने आवाज केला असता बिबट्याने या ठिकाणाहुन पळ काढला.झालेल्या हल्ल्यात दोन शेळ्या मुत्यूमुखी पडल्या आहेत तसेच गोठ्याच्या बाजुला असलेल्या कोंबड्यांच्या खुराडयातुन पंधरा कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या आहेत.

घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी संतोष साळुंखे, त्रिबंक जगताप,स्वप्निल हाडवळे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.


दरम्यान राजुरी या ठिकाणी दोनच दिवसांपुर्वी जावेद पटेल या शेतक-याचा बोकड बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता. दिवसेंदिवस बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढतच चालले असुन या बिबटयांणा पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे