आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये ‘या’ दिवशी तक्रार निवारण दिन
1 min readआळेफाटा दि.८:- पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल व पोलीस निरीक्षक आळेफाटा यशवंत नलावडे यांनी सर्व जनतेस आव्हान केले आहे की नागरिकांना शेताचे, रस्त्याबाबत, मालकीबाबत, ताब्याबाबत, पाण्याचे पाईपलाईन टाकण्याबाबत किंवा इतर कोणत्याही प्रकारचे वाद संपत नसल्यास दोन पक्षात वाद न करता सरळ आळेफाटा पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा.
असे आवाहन यशवंत नलावडे यांनी केले आहे.बोलताना ते पुढे म्हणाले की आपले वाद वाढून ते मारामारी व गंभीर दुखापत होऊन गुन्हा दाखल होण्यास कारणीभूत होऊ शकतात.
तरी ती वेळ आपणावर येऊ नये या करिता सर्व प्रकारचे वाद दोन्ही पक्षांनी आळेफाटा पोलीस ठाणे येथे एकत्र येऊन शांततेत सोडवावे हा दृष्टिकोन समोर ठेवून दर शनिवारी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत तक्रार निवारण दिन घेण्यात येणार आहे.
तरी सर्व नागरिकांनी आपले वाद सोडविण्यासाठी याचा वापर करून घ्यावा. असे आवाहन यशवंत नलावडे
पोलीस निरीक्षक आळेफाटा पोलीस यांनी केले आहे.