शिक्रापूरात चोरी करणारे सहाजण जेरबंद

1 min read

शिक्रापूर दि.१९:- येथील रिलायन्स जिओ कंपनीच्या गोडाऊनला भगदाड पाडून तांब्याच्या केबल तसेच मोबाईल टॉवरसाठी वापरण्यात येणार्या बॅटऱ्यांसह साहित्याची चोरी करणार्या आरोपीना शिक्रापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. आलम मणीयार, अनिल गुप्ता, विरेंदर जाटाव,

विशाल कश्यप, शिवम कश्यप, श्यामजी यादव अशी पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.नितीन गोपाळा भोर (वय ४०, रा. गाडेवस्ती, वाघोली) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे