ओतूर जवळील कोळमळ्यात बिबट मादी जेरबंद

1 min read

ओतूर दि.१०:- गुरुवार दि.१० रोजी पहाटे 6.00 वाजता ओतूर मधील कोळमळा येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट मादी अंदाजे वय 7 ते 8 वर्ष जेरबंद झाली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली. बिबट पिंजऱ्यात अडकल्याची माहिती समजताच विश्वनाथ बेले वनरक्षक ओतूर, तसेच किसन केदार, गंगाराम जाधव, गणपत केदार,फुलचंद खंडागळे, रोहित लांडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून घटनेची बिबट अडकल्याची खात्री केली. तद्नंतर वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ ओतूर यांना भ्रणध्वनी वरून माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी सर्व वन कर्मचारी तसेच सर्व ग्रामस्थ यांचे मदतीने पिंजऱ्याच्या साहाय्याने सदर बिबट यास योग्य त्या पद्धतीने रेस्क्यू करून त्याला सुखरूप माणिक डोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे