आळेफाटा एसटी स्टँड परिसरात सराईत दागिने चोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

1 min read

आळेफाटा दि.९:-आळेफाटा येथील एस.टी.स्टॅण्ड परिसरात महिल्यांच्या हातातील सोन्याची बांगडी कट करणारी अंबरनाथ, ठाणे येथिल टोळीला आळेफाटा पोलीसांनी केले जेरबंद करत ७ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१८ जुन २०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आळेफाटा येथील बस स्थानकात आशा किसन बांडे (वय ६६) रा.नारायणगाव ता.जुन्नर जि.पुणे या इचलकरंजी या ठिकाणी जाण्यासाठी एसटी मध्ये बसत असताना. त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी कोणीतरी अज्ञात चोरटयांनी गर्दीचा फायदा घेवून कटींग करून चोरून नेलेबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदर दाखल गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक तायडे यांनी विशेष पथक बनवुन त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सदर गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की अशाप्रकारचे गुन्हे करणारे आरोपी हे इरटीगा गाडी क्रमांक एम.०५ ईव्ही ५९१८ यामध्ये आळेफाटा येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने आळेफाटा येथील चौकात नाकाबंदी केली असता. १) कुणाल सुनिल गायकवाड वय ३१ वर्षे रा.अंबरनाथ ठाणे, २) आकाश शाहु रणदिवे वय २६ वर्षे रा.उल्हासनगर ठाणे यांस ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचा कबुली दिल्याने त्यांस नमुद गुन्ह्याचे तपास कामी अटक करण्यात आली असून. यांच्याकडून १२ ग्रॅम सोन्याची लगड व गुन्हयात वापरलेली इरटीगा गाडी असा एकुण ७ लाख ९६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडा, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर,स्था.गुन्हे.शा.चे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पो.हवा.भिमा लोंढे, विनोद गायकवाड,पंकज पारखे,अमित माळुंजे, नविन अरगडे,ओंकार खुणे, गणेश जगताप, प्रशांत तांगडकर यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे