बेल्हे सोसायटीच्या पहिल्या टप्प्यातील पीककर्ज वाटपास सुरुवात
1 min read
बेल्हे दि.९:- येथील बेल्हे (ता. जुन्नर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यातील सभासद शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची सुरुवात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बेल्हे शाखेचे विकास अधिकारी सिद्धेश गुजर व सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आली. यंदाच्या खरीप हंगामासाठी सोसायटीच्या वतीने व जिल्हा बँकेच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात २८२ सभासदांना १८२ हेक्टर क्षेत्रातील ऊस, द्राक्षे, केळी व डाळिंब या पिकांसाठी जवळपास ३ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाला सुरवात झाली असून, यावेळी सभासद शेतकऱ्यांना जिल्हा सहकारी बँकेच्या बेल्हे शाखेकडून
किसन क्रेडिट कार्ड पुस्तकांचे वाटप करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव बाळासाहेब गुंजाळ यांनी दिली. यावेळी जिल्हा बँकेचे विकास अधिकारी सिद्धेश गुजर, सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक गुंजाळ, संचालक जयवंत घोडके, लहू गुंजाळ, काशिनाथ गुंजाळ,
अतुल भांबेरे, मोहन बांगर, संदीप बोरचटे, कैलास औटी, व ग्रामस्थ सावकार पिंगट, संजय चंगेडिया, सखाराम गुंजाळ, सदाशिव खिलारी, ठकसेन शिंदे तसेच संस्थेचे सचिव बाळासाहेब गुंजाळ, कर्मचारी महेंद्र शेळके अमोल जाधव उपस्थित होते.