बोरी बुद्रुक ते मुंबई शिवशाही एसटी बस सुरू

1 min read

बेल्हे दि.१०:- अनेक दिवसांपासून प्रवाशांच्या मागणीला यश आले असुन बोरी – मुंबई हि नविन साध्या दरात असलेली शिवशाही एसटी सुरवात करण्यात आली आहे.बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) या गावातील ग्रामस्थ तसेेच प्रवाशांनी बोरी- मुंबई नविन एसटी चालु करावी अशी मागणी मुंबई सेंट्रल डेपो कडे केली होती. त्यानुसार बुधवार दि.९ पासून एसटी चालु करण्यात आली असुन मुंबईहुन पहाटे ५.४५ वाजता सुटून परळ- घाटकोपर – नेरूळ-पनवेल-लोणावळा-चाकण-मंचर -नारायणगाव- आळेफाटा व बोरी या ठिकाणी दुपारी १.३० वाजता पोहचेल त्यानंतर पंधरा मिनिटे थांबून लगेच आळेफाटा -ओतुर- माळशेज मार्गे कल्याण -ठाणे- मुंबई ला पोहचेल. बस चालु करण्यासाठी मुंबई सेंट्रल चे डेपो मॅनेजर कांबळे, राजू मोजाड, दिघे, गंगाराम पठाडे, मंगेश शिंदे, ऋषिकेश जाधव, युवराज कोरडे, राज भोर, पांडुरंग जाधव, सुनिल जाधव यांनी प्रयत्न केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे