मोठी बातमी! शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्तीची घोषणा

1 min read

मुंबई दि.२:-राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनाम्याची घोषणा केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.

घोषणा केल्यानंतर अनेकांना अश्रू अनावर झाले. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपद सोडणार असून यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचा देखील शरद पवार यांनी घोषित केल आहे. या घोषणेनंतर सर्वांनाच धक्का बसला.

या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला. कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या नावे अनेक घोषणा दिल्या. या सोबतच राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना अश्रु अनावर झाल्याचे बघायला मिळाले.

दरम्यान, कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर अध्यक्षपदासाठी समिती नेमण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
मला विद्यार्थी चळवळीत आधिक रस होता. नववीत असताना पहिला मोर्चा काढला. १९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. त्यानंतर सतत मी विविध पदांवर आहे. म्हणजेच गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत असल्याचे पवार यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे