जुन्नर बाज़ार समितीचा गड राष्ट्रवादी काँग्रेस ने राखला;शिवनेर सहकार पॅनेलचा १८ पैकी १३ जागांवर विजय; विरोधकांना ४ जागा
1 min readजुन्नर दि १: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व काँग्रेस पुरस्कृत व आमदार अतुल बेनके, माजी सभापती संजय काळे, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवनेर सहकार पॅनेलने १८ पैकी १३ जागावर विजय मिळविला, तर विरोधी सर्वपक्षीय शेतकरी परिवर्तन पॅनेलला ४ जागावर समाधान मानावे लागले.
दोन गटातील २ जागांवर एक जागेवर समान मते पडल्याने आणि एक उमेदवारला केवळ दोन मते जादा असल्याने या दोन्ही गटात हरकत आल्याने दोन गटांचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी राखून ठेवला.
सोसायटी मतदार संघात अपेक्षेप्रमाणे प्रमाने ११ पैकी ९ जागा मिळवीत शिवनेर सहकार पॅनेलने आपले वर्चस्व कायम ठेवले.
ग्रामपंचायत मतदारसंघात मात्र सदस्य शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलने ४ पैकी 3 जागा मिळाविल्या. तर शेतकरी सहकारी पॅनेलला एका जागेवर समाधान मानावे लागले. आडते व्यापारी मतदारसंघात शिवनेर सहकार पॅनेलने दोन्ही जागा जिंकल्या.
शेतकरी विकास ‘परिवर्तन पॅनेलचे उमेदवार माऊली खंडागळे ४९० मते मिळवून विजयी झाले, या गटात शिवनेरी सहकार पॅनेलचे संदीप शिंदे च शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलचे संतोष चव्हाण चव्हाण यांना प्रत्येकी ४२१ समसमान मते पडल्याने फेर मोजनीचा अर्ज शेतकरी परिवर्तन पॅनेलने केला.
कृषी पतसंस्था व सहकारी संस्था मतदार संघातील शिवनेर सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार :
■ संजय शिवाजीराव । महिला प्रतिनिधी गटात शिवनेर सहकार पॅनेलचे उमेदवार आरती वारुळे (५२८) विमल तळपे (४४३) विजयी झाले.
काळे (५२७]. निवृत्ती काळे (४६२) प्रकाश ताजणे (४४४), पांडुरंग गाडगे (४२७)
■ इतर मागासवर्गीय गटात शिवनेर सहकार पॅनेलने तुषारथोरात ५२८ विजयी झाले.
नबाजी घाडगे (४२२) विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटात शिवनेर सहकार पॅनेलचे धोंडीभाऊ पिंगट (४५८] तर शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलने सावकार पिंगट ४५६ मते मिळाली, धोंडीभाऊ पिंगट यांना २ मते जादा मिळाल्याने या गटाची फेर- मतमोजणीचा अर्ज शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलने केला.
■ ग्रामपंचायत सदस्य मतदार संघात शिवनेर सहकार पॅनेलचे प्रितम काळे ५९१ मते मिळवून विजयी झाले तर शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलचे भास्कर गाडगे ४७२ विजयी झाले.
■ अनुसूचित जाती जमाती शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलचे जनार्दन मरभळ ४७३ मते मिळवून विजयी झाले.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघात शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या प्रियांका शेळके ५५२ मतांनी विजयी.
■ आडते व्यापारी मतदारसंघात शिवनेर सहकार पॅनेलचे धनेश संचेती ५१८ मते तर सारंग घोलप ६१२ मते मिळवून विजयी झाले. हमाल मापाडी मतदारसंघात शिवनेर सहकार पॅनेलचे जितेंद्र कासार १३७ विजयी झाले.