जुन्नर तालुक्यात 97.61 टक्के मतदान; संध्याकाळी मतमोजणी

1 min read

जुन्नर दि.30:- कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर चे मतदान प्रक्रिया आज शांततेत संपन्न झाली. यामध्ये एकूण 17 मतदान केंद्रामध्ये हे मतदान पार पडले 3264 मतदारांपैकी 3186 मतदारांनी मतदान केले. तालुक्यात एकूण 97.61% मतदान झाले.

यामध्ये जुन्नर मतदान केंद्र क्रमांक एक 100% मतदान झाले, जुन्नर मतदान केंद्र क्रमांक दोन 97.8 टक्के मतदान, जुन्नर मतदान केंद्र क्रमांक तीन 94.54, जुन्नर मतदान केंद्र क्रमांक चार 94.35, जुन्नर मतदान केंद्र पाच 99.44, आपटाळे मतदान केंद्र क्रमांक सहा 97.85,

मतदान केंद्र क्रमांक सात 99.52, वडज मतदान केंद्र क्रमांक आठ 99.37, वडज मतदान केंद्र क्रमांक नऊ 99.26, नारायणगाव मतदान केंद्र क्रमांक दहा 99.17, नारायणगाव मतदान केंद्र क्रमांक अकरा 100% , ओतुर मतदान केंद्र क्रमांक 12 98.32, ओतूर मतदान केंद्र क्रमांक तेरा 98.46, पिंपळवंडी केंद्र क्रमांक चौदा 98.31, पिंपळवंडी मतदान केंद्र क्रमांक पंधरा 100%,

बेल्हे मतदान केंद्र क्रमांक सोळा 98.51,बेल्हे मतदान केंद्र क्रमांक सतरा 98.83 टक्के असे सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान झाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे