निमगाव सावा मध्ये मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

1 min read

निमगाव सावा दि.२२:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान निमगाव सावा (ता.जुन्नर) ही सेवाभावी संस्था विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. सामाजिक एकोपा, सलोखा आणि बांधिलकी जोपासणे हे कर्तव्य मानून ही संस्था आपले कार्य करत आहे. “रमजान” या पवित्र महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांचे उपवास असतात.

रमजान महिन्यातील उपवास सोडण्यासाठी श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठानकडून निमगाव सावा येथील प्रसिद्ध दर्ग्यामध्ये इफ्तार पार्टी आयोजित केल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग पवार यांनी सांगितले. यावेळी मुस्लिम बांधवांना उपवास सोडण्यासाठी विविध प्रकारचे फराळ, फळे देण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक पांडुरंग पवार, संचालक दत्तात्रय घोडे गुरुजी, निमगाव सावा चे माजी सरपंच इब्राहिम पटेल, अब्दुल पटेल, माजी उपसरपंच नजीर भाई चौगुले, परेश घोडे यांच्यासह गावातील विविध मान्यवर आणि मुस्लिम आणि हिंदू बांधव उपस्थित होते. यावेळी मुस्लिम बांधवांना या पवित्र महिन्यातील उपवासासाठी पांडुरंग पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे