जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत दुरंगी लढत; काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र; ठाकरे गट भाजप-शिंदे गटासोबत

1 min read

जुन्नर दि.२० : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी पुरस्कृत शिवनेर सहकार पॅनेल आणि सर्वपक्षीय पुरस्कृत शेतकरी विकास परिवर्तन पॅनल यांच्यात दुरंगी लढत होणार असल्याचे आज निष्पन्न झाले. जुन्नरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून शिवसेना ठाकरे गटाने भाजप, शिंदे गटासोबत जाऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आज अंतिम मुदत होती. दि.३० एप्रिल रोजी मतदान होणार असून लगेच सायंकाळी मतमोजणी होणार आहे.

 

शेतकरी विकास परिवर्तन पॅनल उमेदवार यादी:- विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी

● सर्वसाधारण गट : ज्ञानेश्वर खंडागळे, सचिन वाळुंज, दिलीप डुंबरे, संतोष चव्हाण, नंदू पानसरे ,अशोक दरेकर ,भगवान घोलप

●महिला राखीव गट : स्वाती ढोले , सीमा तांबे .

●इतर मागासवर्ग गट : दिगंबर घोडेकर

●भटक्या विमुक्त जाती जमाती गट : सावकार पिंगट

ग्रामपंचायत मतदार संघ:-

● सर्वसाधारण गट :भास्कर गाडगे, संभाजी काळे

●अनुसूचित जाती जमाती गट : जनार्दन मरभळ

●आर्थिक दुर्बल गट : प्रियंका शेळके

व्यापारी अडते मतदार संघ गट : विश्वास डोंगरे ,जाकिर बेपारी

हमाल तोलरी गट : संकेत डुंबरे

आम्ही राष्ट्रवादीच्या नाराज गटासोबत : शिवसेना ठाकरे गटराष्ट्रवादी काँग्रेस नाराज गट व इतरांसोबत आघडी करून माजी सभापती रघुनाथ लेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास पॅनेल तयार करून आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी स्पष्ट केले.

शिवनेर सहकारी पॅनेलला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, भाजपच्या आशा बुचके, शिवसेना (शिंदे गट) माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेना(उद्धव ठाकरे) तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शेतकरी विकास परिवर्तन पॅनेल तयार करण्यात आला आहे.

शिवनेर सहकार पॅनेलचे उमेदवार :

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गट

● सर्वसाधारण गट : संजय काळे, निवृत्ती काळे, प्रकाश ताजणे, तुळशीराम भोईर, संदीप शिंदे,पांडुरंग गाडगे, नबाजी घाडगे

●महिला राखीव गट : आरती वारुळे ,विमल तळपे

●इतर मागासवर्ग गट : तुषार थोरात

●भटक्या विमुक्त जाती जमाती गट : धोंडीभाऊ पिंगट

ग्रामपंचायत मतदार संघ:-

● सर्वसाधारण गट : प्रीतम काळे , सचिन उंडे,

●अनुसूचित जाती जमाती गट : गोविंद साबळे

●आर्थिक दुर्बल गट : अमोल चव्हाण

व्यापारी अडते मतदार संघ गट : सारंग घोलप, धनेश संचेती

हमाल तोलरी गट : जितेंद्र कासार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे