राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द ; निवडणूक आयोगाची कार्यवाही

1 min read

मुंबई दि.१०:- निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का मिळाला असून राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे हा पक्ष केवळ प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे. किमान चार राज्यांमध्ये पक्षाचे अस्तित्व असणे गरजेचे आहे. या सगळ्या नियमांमधून राष्ट्रवादी अपात्र ठरला आहे. केवळ राष्ट्रवादी पक्षच नाही तर आणखी काही पक्षांवर देखील ही कारवाई केली असल्याची माहिती मिळत आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर सुनील तटकरे यांनी यासंबधी प्रतिक्रिया दिली आहे. जो निर्णय आला आहे त्याच्याविषयी अधिकृत माहिती आलेली नाही. आम्ही ज्येष्ठ विधिज्ञांकडून सल्ला घेणार आहोत. आमच्याकडे निर्णयाची प्रत आलेली नाही. पंधरा दिवसांपूर्वी आयोगानं आम्हाला आमचे म्हणणे मांडण्यासाठी मुभा दिली होती. आम्ही राष्ट्रीय दर्जा टिकविण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. आता आयोगानं जो निर्णय घेतला आहे त्याबाबत कायदेशीर पाऊल उचलणार आहोत असं त्यांनी म्हंटलं आहे.

10 जानेवारी २००० ला राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. २०१४ पर्यंत दर्जा कायम होता. परंतु त्यानंतर पक्षाला आयोगाने नोटिसा पाठवल्या. इतर राज्यांमधली अस्तित्व कमी झाल्याने निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. इतर राज्यातला प्रादेशिक पक्षांचा दर्जा कमी झाला आहे. निवडणूक आयोगाने काढलेली ऑर्डर १८ पानांची आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे