आळ्याची यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा व देवस्थान कमिटी सज्ज; पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांची घेतली आढावा बैठक
1 min read
आळे दि.१०:-आळे येथील यात्रा उत्साहात व शांततेत पार पडण्यासाठी देवस्थान कमिटी व ग्रामस्थांची बैठक घेऊन सर्वांना आवाहन आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी केले.आळे (ता.जुन्नर) येथील श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलविलेल्या रेडा समाधी यात्रा महोत्सव दि.१५ एप्रिल पासुन सुरू होत असून लाखो भाविक यात्रा निमित्त दर्शनाला येत असल्याने येथील मंदिर परीसराची पहाणी आज (दि.१०) पोलीस निरीक्षक नलावडे यांनी केल्यानंतर उपस्थित यात्रा कमिटी व ग्रामस्थांना माहिती देताना ते बोलत होते.
यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज असून काही पोलीस भाविकांच्या वेशात सुद्धा यात्रेत बारीक लक्ष देऊन असणार आहेत. असे ही त्यांनी बोलताना सांगितले.याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष धनंजय काळे व यात्रा कमिटचे अध्यक्ष एकनाथ कु-हाडे, पंचायत समितीचे माजी सदस्य जीवन शिंदे,
संतवाडी गावचे सरपंच नवनाथ निमसे, संजय शिंदे, अविनाश कु-हाडे,म्हतुजी सहाने, व्यवस्थापक कान्हु पाटील कु-हाडे ,चारूदत्त साबळे,विलास शिरतर,अखंड हरिनाम सप्ताह कमेटीचे अध्यक्ष संतोष पाडेकर, गिरीश कोकणे,ॲड,सुर्दशन भुजबळ,संजय खंडागळे, महेंद्र गुंजाळ,बाळशिराम डावखर, गोरक्षनाथ दिघे, ज्ञानदेव सहाने,बाजीराव निमसे, प्रसन्न डोके, महेंद्र पाडेकर,माधव टकले आदी मान्यवर उपस्थित होते.
येथील यात्रा पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी यात्रा भरत असुन चार दिवस चालते.भजन महोत्सव, पालखी सोहळा,हरि किर्तण, भंडारा,कुस्त्यांचा आखाडा,असे विवीध कार्यक्रम भरवले जातात त्या दृष्टीकोनातून नियोजन करण्यासाठी आरोग्य विभाग,महावितरण कंपनी,पोलीस प्रशासन, एस टी.महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.