जुन्नर बाजार समितीसाठी १८ जगांसाठी २५८ उमेदवारी अर्ज;आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादीचे नेतेच संजय काळे चा पत्ता कट करायला सरसावले
1 min read
जुन्नर दि.४ – जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर २७ मार्च २०२३ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. उमेदवारी अर्ज सोमवारी (दि. ३) दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत ४११ अर्जांची विक्री झाली होती त्यापैकी २५८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.या निवडणुकीत तालुक्यात आघाडीत बिघाडी झाल्याच चित्र दिसून येत आहे तर राष्ट्रवादीचे नेतेच अध्यक्ष संजय काळे यांचा पत्ता कट करायला सरसावले आहेत असं त्यांच्या बोलण्यातुन स्पष्ट दिसून येत आहे.
एकूण १८ जागांसाठी मतदान होणार असून अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवशी कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था सदस्य मतदार संघ (११पैकी) सर्वसाधारण : ११४, महिला राखीव : १५, इतर मागास : २१, विमुक्त / भटक्या जमाती व विशेष मागास : १०. ग्रामपंचायत मतदार संघ (४पैकी) सर्वसाधारण : ५१, अनुसूचित जाती/जमाती : १०, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक : ९. व्यापारी व आडत्या सदस्य मतदार संघ : २१, हमाल-तोलारी सदस्य मतदार संघ : ७ असे एकूण २५८ अर्ज दाखल झाले आहे.
अर्जाची छाननी ५ एप्रिलला होणार असून ६ एप्रिल रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी ६ एप्रिल ते २० एप्रिल मुदत आहे.
पुरंदर तालुक्यात एकूण १४४ ग्रामपंचायती असून त्यापैकी १२२ ग्रामपंचायत सदस्य व ७७ विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकांना मतदानाचा अधिकार असून २२ ग्रामपंचायतीवर प्रशासक आहे. प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार ३ हजार ३२४ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यापैकी विविध कार्यकारी सोसायटीतील १०१६, व्यापारी आडते मतदारसंघातील १०२६, हमाल तोलारी मतदारसंघातील १७८, ग्रामपंचायत सदस्य मतदार संघातील ११०४ मतदार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र एस. कांबळे यांनी दिली.